Swamis Other Maths
श्रीस्वामीसमर्थांच्या मठांविषयी ...
परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज इ. स.1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळीइ. स. 1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्यवीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला (फाशी,जन्मठेप, हत्याकिंवा तोफेच्या तोंडी) बळीपडावे लागे. लोकआर्थिकदृष्ट्या दुर्बल, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशाखडतर प्रसंगी श्रीस्वामी समर्थांनी बावीस वर्षांच्या वास्तव्यात (इ.स. 1856 ते 1878) लोकांचा गेलेला आत्मविश्र्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्र्वास पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनीविश्र्वसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले.
मठांचा उद्देश...
दत्तसंप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयातसंचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. त्यावेळीत्यांनी उपदेश केला की, "मठाचा उद्देश - मठातवेदशास्त्र चर्चा व्हावी, संसारीलोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धीवाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन,कीर्तन, प्रवचन चालू असावे, धर्मजागृतीव्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावेत हे मठाचे कार्य होय.'
शिष्यांनी केलेली मठस्थापना...
प्राकट्य काळात श्रीस्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून "किल्ला बांधुनि राहावे समुद्रतीरी,' "एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही', "जेथून आलास तेथे जा" असे सांगितले. तरकाहींना काही विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनीतयार केलेल्या या ईश्र्वरनिष्ठांच्या मांदियाळीची, याज्ञात-अज्ञात शिष्यांची, प्रशिष्यांचीसंख्या सहज दोनशेच्या घरात जाईल. अष्टदिशीपसरलेल्या मराठी मुलखातील एका विशिष्ट कालखंडातील धर्म, परमार्थइतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की, इ.स. 1878 ते 1925 (स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर) पर्यंतच्याकाळात या प्रदेशात अनेक साक्षत्कारी सत्पुरुष प्रकट झाले. श्रींच्यासर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ, मराठवाडा,खानदेश, कोकण, गोवा,मध्यप्रदेश, सुरत,बेळगाव, कर्नाटक, बडोदा,मुंबई व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेकानेक मठ स्थापन केले. त्यांनीस्थापन केलेल्या मठांची, मंदिरांचीसंख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यांपैकीश्रींच्या कार्यप्रचाराने प्रेरीत काही मठांचे दर्शन करवीत आहोत.
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील मठ
1) श्रीगुरुमंदिर - बाळप्पा महाराज मठ, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
धारवाड जिल्ह्यातील (कर्नाटकराज्य) श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या 30व्यावर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले. श्रींनीअनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले, "माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर. तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा. म्हणजे चांगले फळ मिळेल." त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला. प्रस्तुतमठात समर्थांचा दंड, छाटी,कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळप्पांनीश्रीसमाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तीध्वज फडकविण्याचा मान मिळविला. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनी ती धुरा वाहून नेली. यामठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.
2) वटवृक्ष संस्थान मठ, अक्कलकोट
श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार, जमीनविकून मंदिर बांधले. श्रीसमाधिस्थहोण्यापूर्वी जोतिबाने श्रींना विचारले, "माझे कसे होईल?' श्रीम्हणाले, "तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निध आहे." श्रींच्या हयातीत जोतिबाने 15 वर्षेव समाधीनंतर 41 वर्षेअनन्यभावे सेवा केली. आजमंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून, त्यांचेशिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे. अशीही गुरुशिष्यांची जोडी आहे. आताया मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्याभाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाचीव्यवस्था, खोल्यादेऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, "आमचे नाव नृसिंहभान - दत्तनगरमूळ' त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात.
3) श्रीस्वामी समाधी मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट
पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे. चोळप्पाच्याघराजवळ समाधीमंदिर असून, त्यातश्रींनी दिलेल्या पादुका आहेत. अक्कलकोटसंस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. तीविकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला.
4) जोशीबुवांचा स्वामी मठ, अक्कलकोट
अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत. यानियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली. त्यांनीत्या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली. तोचश्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाट या जोशी मठात होता. सध्यातो "गुरु मंदिरात' असल्याचेकळते.
5) शंकरराव राजेरायन यांचा मठ, अक्कलकोट
हैद्राबाद संस्थानातील गजांतलक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजे रायन यांचा क्षय व ब्रह्मसमंध बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन केला. जुन्याराजवाड्याजवळ हा मठ आहे.
6) मुंबई येथील श्रीस्वामी मठ, गिरगाव ः कांदेवाडी, मुंबई
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील विलये गावातील हरिभाऊ पवार मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये नोकरी करीत असताना भागीदारीत अफूच्या व्यापारात नवस केल्यामुळे श्रींच्या कृपेने तोट्याऐवजी फायदा झाला. अक्कलकोटलाश्रींनी त्यांना चांदीच्या पादुका स्वाधीन केल्या आणि "तू माझा सूत आहेस. अभी तुम दर्या किनारे किल्ला बांधकर वहॉं मेरे नामका झंडा लगाव" अशी आज्ञा केली. स्वामीसुतांनी पत्नीच्या अंगावरील 82 तोळेसोने विकून त्यांची रक्कम ब्राह्मणांना दान करून सर्वस्व लुटवून संसारत्याग केला. त्यांनीगिरगाव कांदेवाडी येथे श्रींचा मठ स्थापन करून अवघ्या मुंबईला स्वामीसेवेचे वेड लावले. "श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ' यामंत्राने मुंबई दणाणून सोडली. स्वामीसुतांनी अनेक शिष्य तयार करून त्यांच्याकडून विविध ठिकाणी मठस्थापना केली व श्रींचे "किल्ले बांधुनी राहावे समुद्रतीरी' याआदेशाचे तंतोतंत पालन केले. श्रद्धाळूभाविकांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराज सतत या मठात उभे आहेत, याचीप्रचिती शेकडो भाविकांना मठात येत असते. आताहा मठ ट्रस्टकडे आहे. गुरुपौर्णिमा,स्वामी जयंती, दत्तजयंतीवगैरे उत्सव संपन्न होतात.
7) श्रीस्वामी मठ, ठाकूरद्वार ः ठाकूरद्वार रोड, काळाराम मंदिर, मुंबई
कीर्तनकार दत्तभक्त श्रीकृष्णबुवा (बापूबुवा)ठाकूरदास. अक्कलकोटलाश्रींचे दर्शन झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील कुष्ठ नाहीसे झाले. श्रींनीत्यांना पादुका देऊन श्रीरघुनाथजीके सन्निध "हमकू नाचनेकु जगा रखो' अशीआज्ञा केली. त्यांनीठाकूरद्वारला काळाराम देवस्थानजवळ छोट्या मंदिरात पादुकांची स्थापना करून "श्रीगुरू स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ' हामंत्र वाचून उड्या मारून भजनं म्हणण्यास सुरुवात केली व लोकसंग्रह केला. अशातऱ्हेने श्रींचा भव्य मठ (किल्ला)बांधून आधीच जिभेवर सरस्वती असलेल्या या महापुरुषाने-कीर्तनकाराने मोरावर आरूढ न होता घोड्यावर आरूढ होऊन आपल्या मुलूख मैदान तोफा-बंदुकांनी श्रींच्या प्रचार रणधुमाळीने मुंबई शहर दणाणून सोडले. यामठात दत्तजयंती, स्वामीपुण्यतिथी नामसप्ताह दर गुरुवारी रात्री अभिषेक, आरती,पालखी व तीर्थप्रसाद होतो.
8) श्रीस्वामी मठ, महालक्ष्मी ः भुलाभाई देसाई रोड, मफतलाल पार्कच्या मागे, महालक्ष्मी मंदिराजवळ,
मुंबई सरकारचे ओरिएंटल ट्रान्सलेटर विनायक वासुदेव आगासकर यांनी पिनल कोडचे पहिले सुबोध मराठी भाषांतर केले. तेअक्कलकोटला गेले असताना श्रींनी त्यांना "दर्या किनारी बसून आनंद कर जा" अशी आज्ञा केली. त्यांच्यापत्नीला "पत्थरावर पैसे ठोक" असे सांगितले. त्याचाअर्थ पादुका स्थापन कर, असाहोतो. आयुष्याच्या अखेरीस विनायकराव थकले असताना श्रींनी त्यांना अक्कलकोटला येण्याची जरुरी नाही, असेसांगून मुंबईचे रावसाहेब ढवळे यांच्यामार्फत पादुका पाठविल्या. विनायकरावांनी चौपाटी किनाऱ्यावर छोटेसे टुमदार संगमरवरी पाषाणाचे मंदिर बांधून त्यात आत्मलिंग पादुका (छोट्याशा)एका चांदीच्या डबीत ठेवल्या आहेत. यापादुकांचे दर्शन सकाळीच पूजेच्या वेळी घडते. चौपाटीचेवादळी वारे व पर्वतप्राय लाटा त्यांच्यापुढे हे स्वामी मंदिर आजपावेतो टिकून आहे.
9) श्रीस्वामी मठ, दादर ः डी. एल. वैद्य रोड, शिवसेना भवनजवळ, कोहिनूर मिल समोर, दादर, मुंबई
शिवभक्त रामचंद्र व्यंकटेश भेंडे यांना श्रींनी पादुका देऊन "किल्ला बांधुनी राहावे समुद्रतीरी" अशी आज्ञा करून मुंबईला पाठविले. आज्ञेनुसारभेंडे ऊर्फ तातमहाराज व सुरतचे त्यांचे परमशिष्य बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये या दोघांनी मिळून दादरला श्रींचा मठ बांधला. यामठात तातमहाराज व बाळकृष्णमहाराज तसेच इतर संतांचे फोटो आहेत. मंदिराच्यागर्भघरात श्रींचे अप्रतिम मोठे भव्य तैलचित्र असून, त्यांच्याआत्मलिंग पादुका आहेत. मठामध्येस्वामी जयंती, पुण्यतिथी,गुरुपौर्णिमा, दत्तजयंतीवगैरे उत्सव मोठ्या प्रमाणावर आजही संपन्न होतात. मुंबईच्याया जागृत मठावर जनतेचे अलोट प्रेम आहे. भाविकजनश्रींकडे साकडे घालतात व श्रीही आपलाच माणूस समजून त्यांचे मनोरथ आजही पूर्ण करतात.
10) श्रीस्वामी मठ, दादर (रामकृष्ण महाराज जांभेकर मठ)ः जांभेकर पथ, दादर चौपाटी, मुंबई
रत्नागिरी जिल्ह्यातील पोंबुर्ले गावचे गायत्री मंत्राचे महान उपासक रामकृष्ण अंताजी जांभेकर यांना पेशावर येथे श्रींनी अवलियाच्या रूपात दर्शन देऊन म्हटले, "चारचौघांसारखा संसार करण्यासाठी तू जन्माला आला नाहीस. तुझे जीवितकार्य वेगळे आहे. लवकरच तू संसारपाशातून मोकळा होशील. देवाची तशी इच्छा आहे. मी तुला एक सबीज मंत्र देतो. त्याचा तू निरंतर जप कर." त्या सबीज मंत्राचा व गायत्री मंत्राचा जप करून ते सिद्ध पुरुष झाले. त्यांनीप्रभादेवी येथे स्मशानभूमीजवळ समर्थांचा मठ बांधून लोककल्याणाचे अभूतपूर्व कार्य केले. त्यांच्यापश्र्चात त्यांचे शिष्य नामदेव महाराज व माऊली काशीबाई चव्हाण व सध्या अप्पा जगदाळे यांनी मठाची सेवा अखंडित चालू ठेवली आहे. हेजागृत स्थान असून, बऱ्याचभाविकांना येथे प्रचिती येत असते.
11) श्रीस्वामी मठ, ताडदेव (नाईककरंडे स्थापित)ः नाना शंकरशेट मंदिराजवळ, नाना चौक, ताडदेव रोड, झवेरी बिल्डींग, मुंबई
नाईक करंडे यांचे वंशज नेहमी अक्कलकोटची वारी करीत असत. त्यांच्यावंशातील रामचंद्र नावाच्या दीड वर्षाच्या मुलाला पायाला सेप्टिक होऊन जे. जे.हॉस्पिटलचे प्रख्यात सर्जन टॉडहंटर साहेब यांनी तपासून पाय कापण्याचे ठरविले. परंतुश्रींच्या आज्ञेप्रमाणे हत्तीच्या मुतात माती कालवून पायावर लेप लावताच पाय चांगला झाला. त्यामुलाच्या मस्तकावर श्रींनी कृपावरदहस्त ठेवून चर्मपादुका दिल्या. याचर्मपादुकांची पूजा आजपावेतो त्यांच्या वंशजांत अखंड चालू आहे. श्रींच्याअक्कलकोट प्रवेशाला शंभर वर्षे झाली. त्यावेळीउत्सव करण्यात आला. इ.स. 1957 मध्ये त्यांच्या घरी कोब्यावर स्वामींची पावले उमटली व रात्री दृष्टान्तात श्रींनी सांगितले, "मै गया नही जिंदा हूँ"
12) श्रीस्वामी मठ, चेंबूर
मुंबईच्या हरिभाऊ पवार ऊर्फ स्वामीसुत यांची कन्या सिद्धाबाई हिने समर्थांच्या चांदीच्या पादुका (स्वामींनीज्या स्वतःच्या पायात 14 दिवसघातल्या होत्या) चर्मपादुका,चिपळ्या, माळ,इत्यादी वस्तू असलेला हा मठ स्थापन केला. यामठात श्रींचे तीन-चार फोटोही आहेत. हल्लीहरिभाऊ नलावडे हे पुजारी म्हणून मठाची व्यवस्था पाहतात. श्रीदत्तजयंती, श्रीस्वामी जयंती वगैरे उत्सव नलावडे कुटुंबीय अहोरात्र मेहनत घेऊन पार पाडतात. हास्वामीसुतांचा जागृत पादुका मठ असून, कितीतरीदर्शनार्थी लोक या मठाचा लाभ घेतात.
13) श्रीस्वामी मठ, उमराळे ः नाला सोपारा स्टेशन, पश्र्चिम रेल्वे, सोपारे, ता. वसई, जिल्हा ठाणे
उमराळे येथील कीर्तनकार मोरेश्र्वर जोशी यांना श्रींनी "प्रसाद' म्हणून दगडावर कोरलेल्या पादुका व पितळी चौरंगावरील पादुका नित्य पूजनासाठी देऊन "तुझा संसार सुखाचा होईल. देवकार्य होऊन तू संन्यास घेशील. तुझ्या समाधीवर ठेवण्यासाठी हा दगडी पादुकांचा ठेवा जतन करून ठेव आणि लळिताचा व्यवसाय बंद करून हाती वीणा घेऊन हरिकीर्तन सुरू कर. तुझ्या वंशात ही हरिकीर्तनाची परंपरा कायम राहील. जा, पण त्यासाठी श्रीराम मंदिर बांध. जा." अशी आज्ञा केली. मोरेश्र्वरबुवा ऊर्फ मयुरानंद सरस्वती स्वामींनी राम मंदिर बांधून कीर्तनाद्वारे ठाणे जिल्ह्यात श्रींची भक्ती वाढवली. आजहीदत्तमंदिरात ही कीर्तनसेवा त्यांच्या वंशजांकडून अखंडित चालू आहे.
14) श्रीस्वामी मठ, ठाणे ः श्रीदत्त मंदिर, चेंदणी, अशोक टॉकीज मागे, ठाणे (पश्र्चिम)-400602
ठाण्याचे पांडुबुवा कोळी यांना महासागरात वादळ झाले असता बुडणारे जहाज वाचवून श्रींनी त्यांना अक्कलकोटला अनुग्रह देऊन "आनंदभारती व्हा' असेम्हटले. त्या आनंदभारती महाराजांनी हजारो भक्तांना भक्तिमार्गाचे संस्कार करून स्वामीसेवेस लावले. वरीलदत्तमंदिरात मध्यभागी दत्तमहाराजांची सुंदर मूर्ती असून, गाभाऱ्यालाजोडून बाहेर स्वामी महाराजांची व आनंदभारती महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. वरीलमंदिर शंभर वर्षांचे असून त्यात मारूती, शंकर,शितळादेवी, विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. आनंदभारतीमहाराजांची समाधी नौपाडा, शिवाजीनगर,ठाणे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आहे. आनंदभारतीमहाराजांनी आपले परमशिष्य विद्वांस यांना स्वतः सांगून "श्रीगुरुलीलामृत' ही21 अध्यायांची ओवीबद्ध पोथी त्यांच्याकडून लिहून घेतली. तीपोथी अनेक स्वामी भक्तांच्या वाचनात, पठणात,पारायणात असते. आनंदभारतीमहाराजांनी श्रींचे "किल्ला बंाधुनि रहावे समुद्रतीरी' याआज्ञेचे पूर्णपणे परिपालन केले.
15) श्रीस्वामी मठ, वैतरणा
नामांकित म्युनिसिपल सिटी इंजिनिअर नानासाहेब मोडक यांनी श्रीस्वामी समर्थांचे अप्रतिम तैलचित्र मुंबईच्या शरच्चंद्र नाडकर्णी यांच्याकडून तयार केले. त्याफोटोची स्थापना त्यांनी वैतरणा जलाशयाच्या प्रवेश जागी मंदिर बांधून केली.
पुणे येथील श्रीस्वामी मठ
16) श्रीस्वामी मठ, पुणे ः श्रीनाथ टॉकिजजवळ, 22 शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडई व रामेश्र्वर चौकाजवळ, पुणे-411030
पुण्याचे स्वामीभक्त हरिभाऊ ऊर्फ अण्णासाहेब वीरकर शेट्ये यांच्या मातुःश्री दर महिन्याला अक्कलकोटची वारी करीत असत. तिचीश्रींची दर्शनाची सेवा बरीच वर्षे चालू होती. "आता प्रसाद मिळावा' असाविचार वृद्ध मातुःश्री यांनी करून त्या अक्कलकोटला गेल्या असताना श्रींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखून म्हटले, "माते, तू थकलीस! यापुढे तू अक्कलकोटची वारी करून नकोस. मी सदैव तुझ्याकडे वास करीन" असे म्हणून श्री उभे राहिले. श्रींनीआपली टोपी आपटली. भिक्षेचीझोळी, खेळावयाच्या गोट्या, स्वतःच्याचर्मपादुका, श्रीफलतिच्या स्वाधीन केले व पुण्यास जाण्याचा आदेश दिला. पुढेअण्णासाहेब शेट्ये यांनी मठामध्ये पादुका स्थापन केल्या. यामठात श्रींची कमरेवर एक हात ठेवलेली उभी संगमरवरी मूर्ती, औदुंबरवृक्ष तसेच श्रींच्या प्रासादिक चर्मपादुका आहेत. श्रींचाप्रत्यक्ष वास या ठिकाणी आहे, अशीभाविकांना प्रचिती आलेली आहे. मूर्तीप्रसन्न असून, सकाळीमूर्तीचे बालस्वरूपात दुपारी तरुण स्वरूपात व रात्री शांत स्वरूप अशी तिची रूपे अनेक असून स्वामी जयंती, दत्तजयंती वगैरे उत्सव मोठ्या प्रमाणावर होतात.
17) श्रीस्वामी मठ, (भटांचा स्वामी मठ) ः 668, सदाशिव पेठ, पुणे-411030 -
स. ना. भटयांना इ. स.1937 च्या शुभदिनी पहाटे साडेपाच वाजता श्रींनी स्वप्नदृष्टांतात संन्याशाच्या वेशात त्यांच्या घराच्या कंपौंडमध्ये औदुंबराच्या झाडाखाली बसून दर्शन दिले होते. त्यावेळी त्या संन्याशाने भटांना औदुंबराजवळच्या घराच्या कंपौंडमध्ये मठ स्थापण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणेमठ स्थापना केली. त्यामठात जिवंत, जागृतअसा श्रींचा मोठा फोटो असून, मठातीलवातावरण अत्यंत प्रसन्न आहे. भटांनापुष्कळ वेळा श्रींनी दुष्टांत, दैविकअनुभव दिले होते. गुरुवार,गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी जयंती, पुण्यतिथीउत्सवात भक्तांची फार गर्दी असते.
18) श्रीस्वामी मठ, ताथवडे ः पो. चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे
कोल्हापूरचे वामनराव घाणेकर हे समर्थशिष्य, बाळप्पांचेअनुग्रहित शिष्य असून "एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही' याश्रींच्या दृष्टांतानुसार बाळप्पांनी दिलेल्या पादुकांची ताथवड्याला मठ स्थापना केली. दाढीवाल्यादत्ताचे मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्यांचेशिष्य शिवडावचे दाजी नाडकर्णी यांनीसुद्धा मठ स्थापना केली.
19) श्रीस्वामी मठ ः भोर जिल्हा, पुणे
रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण तालुक्यातील कुसुर गावचे दत्तभट पिंगे यांना श्रींचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर तीर्थयात्रा व नर्मदा प्रदक्षिणा करून पुण्यातील भोर येथे अवतार कार्य केले. त्यांनीइ. स. 1912 मध्ये समाधी घेतली. समाधीस्थानीएक भव्य मंदिर बांधून श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली असून, भोरसंस्थानामार्फत व्यवस्था पाहिली जाते.
20) श्रीस्वामी मठ, चिपळुण ः मार्कंडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोर्ले गावचे गोपाळ रामचंद्र केळकर यांना रेल्वेमध्ये नागपूरला नोकरी करीत असताना असाध्य जलोदराची व्याधी जडली. श्रींनीत्यांची व्याधी नष्ट करून त्यांना अनुग्रह देऊन चांदीच्या पादुका, झोळी,दंड या वस्तू देऊन मार्कंडेय मठ स्थापन करण्यास पाठविले. त्यांनीअक्कलकोटच्या सहा वर्षांच्या वास्तव्यात श्रींच्या लीला स्मरणात ठेवून त्या लीला मोडीमध्ये ग्रंथित केल्या. त्यालीला मराठीमध्ये "श्रीस्वामी समर्थ बखर' म्हणूनप्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातश्रींच्या 296 लीलाआहेत. प्रत्यक्ष श्रीच त्या लीला घडवीत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव व प्रचिती येते. त्यालीला स्वामीभक्तांनी नित्य वाचाव्यात, पठणातठेवाव्यात. आजहीत्यांचे नातू नारायणराव दत्तात्रेय केळकर सेवा करीत असतात. श्रींच्याजन्मोत्सवाच्या वेळी श्रींच्या पादुकांवरील चांदीचे छत्र हलते याचा अनुभव बऱ्याच भक्तांनी अनुभवला आहे. हेश्रींचे कोकणातील जागृत स्थान असून या मठात श्रींची जयंती, स्वामीसुतजयंती, गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशीवगैरे उत्सव संपन्न होतात.
21) श्रीस्वामी मठ, वेंगुर्ले (धावडे) ः ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
गुरुदास एकनाथ वालावलकर हे मुंबईच्या तातमहाराजांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला गेले. अक्कलकोटलाश्री सन्निध सहा वर्षे सेवा केल्यानंतर श्रींनी ओकण्याच्या क्रियेतून त्यांना लहान चिमुकल्या पादुका दिल्या व म्हटले, "बाळ, मी तुला माझे आत्मलिंग देतो, ते घे आणि जनांस सन्मार्गास लाव". आनंदनाथांनीवेगुंर्ले कॅंपात धावडे येथे श्रींनी दिलेल्या आत्मलिंगाची स्थापना करून मठ बांधला. आनंदनाथमहाराजांनी असंख्य अभंग, काव्य,गीतरचना, हुक्का,ललकाऱ्या, स्वामीस्तवन, श्रींचे स्तोत्र वगैरे श्रींवर मोठी काव्यरचना केली. तीपुस्तकरुपाने प्रसिद्ध झाली आहे. त्यांचेअभंग वगैरे श्रींच्या निरनिराळ्या मठातून म्हटले जातात. आतात्यांचे नातू गुरुनाथ वालावलकर हे मठाची व्यवस्था पाहतात. हाआत्मलिंग पादुकांचा मठ जागृत असून, भाविकांनाप्रचिती येते.
22) श्रीस्वामी मठ, होडावडे ः ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
आनंदनाथ महाराजांनी श्रींकडून प्रसाद म्हणून प्राप्त झालेल्या आत्मपादुका घेऊन ते येवले-सावरगाव व तेथून सावंतवाडी होडावडे येथे गेले. होडावडेयेथे पै यांचे दारी आलेल्या औदुंबराखाली त्यांनी स्थापन केलेल्या श्रींच्या पादुका आहेत. त्यानंतरसावंतवाडीस काही काळ राहिले. त्यानंतरते वेंगुर्ल्यास धावडे कॅंपात गेले.
23) श्रीस्वामी मठ, सावर्डे ः ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील रहिवासी रामचंद्र नरसिंह वहाळकर (काटदरे)हे चिपळूणच्या गोपाळबुवा केळकरांचे अनुग्रहित शिष्य असून त्यांनी 14 वर्षेखडतर तपश्र्चर्या, कोटीमंत्र जपानुष्ठान, गायत्रीमंत्र पुरश्चरण, ध्यानधारणा,योगसाधना केली व अनेक तीर्थयात्रा केल्या. गुरुआज्ञेनुसार सावर्डे येथील दत्तमंदिराचा जीर्णोद्धार करून मठ स्थापन केला.
24) श्रीस्वामी मठ, डेरवण ः ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
सावंतवाडीतील तेरसे बांबर्डे गावचे शिवभक्त सीताराम आत्माराम वालावलकर यांना सावर्डे दत्तमंदिरातील वहाळकरबुवा यांनी अनुग्रह दिला. गुरुआज्ञेनुसार त्यांनी तीर्थयात्रा केल्या व त्यांना श्रींचा साक्षात्कार झाला. त्यांनीपरमेश्र्वराच्या व मानवतेच्या सेवेला वाहून घेतले. त्यांनीश्रीस्वामी मंदिर व राम मंदिराची स्थापना केली. इ.स. 1969 मध्ये समाधिस्थ झाल्यावर श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झाला.
25) श्रीस्वामी मठ, नाखरे ः जि. रत्नागिरी
मुंबईच्या कांदेवाडी मठात स्वामीसुतांचे पुष्कळ शिष्य होते. नानासोहनी म्हणून कोकणस्थ ब्राह्मण मुंबईत म्युनिसिपल कोर्टात दीडशे रुपयांवर नोकरी करीत होते. तेस्वामीसुतांच्या मठात छलकपट बुद्धीने येत असता काही दिवसांनी त्यांना पश्र्चात्ताप होऊन ते अक्कलकोटास गेले. तेथेश्रींचे दर्शन घेतल्यावर त्यांचा सर्व संशय दूर झाला व ते स्वामीभक्त झाले. मुंबईसआल्यावर नोकरीचा राजीनामा देऊन लंगोट लावून पत्नीसह झोळी घेऊन निःशंकपणे मुंबईत राहून श्रीसेवेत मग्न झाले. काहीदिवसांनी स्वामीसुतांनी त्यांना समर्थांच्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या. रत्नागिरीजवळनाखरे गावी त्यांनी मठ स्थापन केला. अशातऱ्हेने नाना सोहनींकडून मठस्थापना स्वामीसुतांनी करवून घेतली.
26) श्रीस्वामी मठ, शिवडाव (परमार्थ साधनालय)ः मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीजवळ, जि. सिंधुदुर्ग
दिनकर शिवरामपंत नाडकर्णी हे ताथवड्याचे वामनराव महाराज यांचे अनुग्रहित शिष्य होते. वामनमहाराजांनी सांगितल्याप्रमाणे "एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही' यासद्गुरू आज्ञेप्रमाणे तीर्थयात्रा करून शिवडाव येथे "परमार्थ साधनालय' स्थापूनलोकसंग्रहाचे कार्य केले. त्यांनीगोव्यामध्ये श्रीक्षेत्र झारबाग येथेसुद्धा "परमार्थ साधनालय' स्थापनकेले. त्यांनी गोव्यातील बऱ्याच बाटलेल्या हिंदू-ख्रिश्र्चनांना नंतर उपदेश केला. कैवल्याश्रमस्वामींची समाधी संगमरवरी असून ते जागृत स्थान आहे. दोन्हीपरमार्थ साधनालयात आजही उत्सव फार मोठ्या प्रमाणावर संपन्न होतात.
27) श्रीस्वामी मठ (रांगोळी महाराज आश्रम, भरड) ः ता. मालवण, जि. रत्नागिरी
कोल्हापूरचे शिवराम बावडेकर लहानपणी अक्कलकोटला गेले असताना स्वामी म्हणाले, "हा मुलगा आम्हाला देता का?' त्याबाळाला मांडीवर घेऊन त्याला "रांगोळी महाराज' असेनामकरण करून कोल्हापूरच्या श्रीकृष्णसरस्वतींची सेवा करण्याची आज्ञा केली. याश्रीकृष्णसरस्वतींच्या अनुग्रहित शिष्याने जवळजवळ 15 वर्षेलोकोद्धाराचे कार्य केले. तेश्रीकृष्णसरस्वतींच्या मठात विविध रंगांनी नटलेल्या रांगोळ्या घालीत. त्यांनाकोल्हापूरच्या राजदरबारात "रांगोळी महाराज' म्हणूनकिताब मिळाला होता. रांगोळीमहाराजांनी त्यांचे शिष्य राजाराम लक्ष्मण आमरे यांच्या घरी वास्तव्य केले. तेथेनित्य भजन, दत्तजयंती, पुण्यतिथी वगैरे उत्सव आजही पार पाडले जातात.
28) श्रीस्वामी मठ, तळगाव ः कुडाळजवळ, सिंधुदुर्ग
तळगावचे बाबूराव दत्तात्रेय दळवी हे शिवडावचे कैवल्याश्रम स्वामींचे अनुग्रहित शिष्य असून, त्यांनीतीर्थयात्रा करून जनजागृती केली. त्यांनीभिकाजी धर्मसंस्था, श्रीदत्तगृहसंस्था व वासुदेव गोरक्षण संस्था स्थापन करून जनकल्याणाचे कार्य केले. भिकाजीधर्म संस्था मठात त्यांची समाधी असून तेथे उत्सव संपन्न होतात. त्यांचेशिष्य परमपूज्य शाम पागनीस महाराज यांनी त्यांचे कार्य पुढे चालविले आहे.
29) श्रीस्वामी मठ, साळगाव ः सावंतवाडी दत्तमंदिर, जिल्हा सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली गावातील दत्तात्रेय गोखले हे अक्कलकोटला श्रीसान्निध्यात काही काळ होते. श्रींनीदत्तगिरींच्या मनातील जळमटे दूर करून त्यांची आध्यात्मिक प्रगती केली आणि त्यांना श्रीपादांच्या पादुका प्रसाद म्हणून भेट दिल्या. पुढेचंदगडजवळील ताम्रपर्णी नदीच्या काठी पिशाच्चवाडी येथील गोविंद नारायण सामंत यांच्या घराभोवती पादुकांची स्थापना करून मठ स्थापन केला. आताश्रीपादवाडी हे तीर्थक्षेत्र झाले आहे. दत्तगिरीपुढे सावंतवाडीतील साळगावात गेले व तेथे त्यांनी दत्तमंदिर बांधले. तेस्थान दत्तवाडी म्हणून ओळखले जाते.
30) बाबा घोलपांचा मठ ः नाशिक
नाशिकचे रामचंद्र घोलप यांना वणीच्या सप्तश्रृंगी देवीने दर्शन देऊन उपकृत केले होते. त्यांचीअध्यात्मामधील प्रगती पाहून श्रींनी घोलपांना एके दिवशी पहाटे गंगेवर यतीरुपात दर्शन दिले व सांगितले, "आम्ही अक्कलकोटास असतो. तुझ्या कर्माचे फळ देण्याकरिता आत्ताच आलो." व अंतर्धान पावले. श्रींनादिलेल्या पादुकांची त्यांनी स्थापना केली व पुढे "अद्वैतेंद्र सरस्वती' हेनाम धारण केले.
31) श्रीस्वामी मठ, सावरगाव ः येवले, जिल्हा - नाशिक
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस 50 किलोमीटरअंतरावर सावरगाव असून, तेथेश्रींचे अनुग्रहित शिष्य आनंदनाथ महाराज गेले व त्यांनी मठ स्थापना केली. पुढेत्यांनी मोरोपंत कुलकर्णी यांना अनुग्रह दिला व ते वेंगुर्ले येथे गेले. कुलकर्णींच्या पश्र्चात या मठाची व्यवस्था अनुक्रमे पुंडलिक महाराज व हरि नारायण जोशी या शिष्य-प्रशिष्यांनी पुढे चालू ठेवली.
32) श्रीस्वामी समर्थ दरबार ः नाशिक
नारायणदास श्रीपाद श्रीवल्लभ पिठले हे श्रींचे अनुग्रहित शिष्य असून, त्यांनीश्रींचे आज्ञेनुसार 12 वर्षेमानस सरोवराजवळ, 12 वर्षेश्रीपाद श्रीवल्लभ यांजकडून तेजाची उपासना व त्र्यंबकेश्र्वर येथे 12 वर्षेतपश्र्चर्या, उपासनाकेली. श्रींनी त्यांच्याकडून मानवतेचा उत्कर्ष करणारी प्रचंड प्रकल्पाची आखणी करून आपले शिष्य मोरेदादा यांजकडून प्रकल्प कार्यान्वित केला.
33) श्रीस्वामी मठ, समर्थसेवा व आध्यात्मिक विकास केंद्र ः दिंडोरी, जिल्हा नाशिक
खंडेराव आप्पाजी मोरे ऊर्फ मोरेदादा हे श्रींचे अनुग्रहित शिष्य असून त्यांनी पिठले महाराजांनी तयार केलेला प्रकल्प राबविण्याचे कार्य श्रीस्वामी समर्थ दरबार स्थापन करून केले व महाराष्ट्रात दीडशेहून अधिक केंद्रे स्थापन केली. हाप्रकल्प पुढे त्यांचे चिरंजीव अण्णासाहेब मोरे यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अकराशे श्रीस्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रे स्थापन करून चालविला आहे.
34) श्रीस्वामी निर्गुण मठ ः सांगली
कोल्हापूरच्या अंबाबाईचे निस्सीम भक्त सांगलीचे हणमंतराव कोटणीसांना श्रींनी म्हटले, "दुजाभाव मनात कधीच आणू नये. संकल्पकेल्यावर पंचाईत होते हे खरे. पणमला सांग तुझी अंबाबाई तरी अशीच असेल की नाही?' आणिश्रींच्या जागी कोटनीसांना अंबाबाईचे दर्शन झाले. पुढेकोटणीसांनी सांगलीला निर्गुण मठ स्थापन केला. त्यातसमर्थांची पूजा अंबाबाईच्या स्वरूपात केली जाते.
35) श्रीस्वामी मठ, (नीळकंठ महाराज मठ) ः सांगली
गोविंदशास्त्री चिकोडीकर यांना श्रीकृष्ण सरस्वतींच्या कृपेने नीळकंठ नावाचा पुत्र झाला. त्यानीळकंठ महाराजांचे वास्तव्य त्यांचे भक्त नरहर गणेश नानिवडेकर यांच्याकडे होते. तेथेचत्यांचा पादुका मठ आहे.
36) श्रीस्वामी मठ ः बार्शी
कोल्हापूरच्या बावडेकरबुवा पुराणिकांस काशीक्षेत्रात कॉलऱ्याच्या साथीत मृत्युशय्येवर असताना श्रींनी यतीवेशात दर्शन देऊन अंगावरून हात फिरवून औषध दिले व ते अंतर्धान पावले. श्रींनीसमाधीसमयी आपल्या प्रिय भक्ताला सर्व खेळणी बार्शीस पाठविली. तीत्यांनी या मठात स्थापन केली आहेत.
37) श्रीस्वामी मठ (नगरचा रेखी मठ) ः अहमदनगर, जिल्हा अहमदनगर
मुंबईचे स्वामीसुतांचे शिष्य नाना रेखी जोशी हे स्वामीसुतांच्या आदेशानुसार अक्कलकोटला गेले असताना त्यांनी श्रींच्या आदेशानुसार त्यांची जन्मकुंडली तयार केली व त्यावर श्रींनी शिक्कामोर्तब केले. नानारेखींनी स्वामीसुतांच्या कृपाआशीर्वादाने नगरला जाऊन मठ स्थापन केली. श्रींनी आपल्या चर्मपादुका धोंडभट ब्राह्मणाकडे दिल्या. त्याधोडंभटांनी आपल्या डोक्यावरून अक्कलकोट ते नगर आणल्या व नाना रेखींकडे सुपूर्द केल्या. रेखींनीत्या पादुका आपल्या घरीच स्थापन केल्या. हाजागृत मठ गुजर गल्लीमध्ये आहे. आजहीत्या मठाची परंपरा त्यांचे नातू कुशाभाऊ पाहात आहेत.
38) बार्शी मठ, देवस्थान ः बार्शी
अहमदनगर जिल्ह्यातील माळेचिंचोर येथील यशवंतराव कृष्णराव कुलकर्णी यांना श्रींनी अनुग्रह दिल्यानंतर यशवंतराव महाराज जालनापूरकर यांनी बळवंत बहिरट यांच्या जागेमध्ये बार्शी येथे देवस्थानची स्थापना केली.
39) श्रीस्वामी मठ, खर्डी (सीताराम महाराज मठ) ः ता. पंढरपूर, जि. सोलापूर
सावत्र आईच्या छळाला कंटाळून पित्याची आज्ञा घेऊन मंगळवेढ्याचा 12 वर्षांचासीताराम पंढरपूरमार्गे श्रींकडे अक्कलकोटला गेला. श्रीसान्निध्यात सहा वर्षे राहिल्यानंतर तो सिद्धपुरुष झाला. श्रींनीअंतर्ज्ञानाने हे जाणून त्याला कृपाशीर्वाद देऊन म्हटले, "जेथून आलास तेथे जा." मंगळवेढ्याला सीताराम महाराजांनी चाळीस वर्षांच्या वास्तव्यात अनेकांना सन्मार्गाला लावले. पंढरपूरजवळ14 किलोमीटर अंतरावर खर्डी हे पवित्र क्षेत्र असून जणू दुसरे गाणगापूरच आहे. करणी,पिशाच्चबाधा, पितृपीडा,भानामती, ब्रह्मसमंध,भूतबाधा वगैरे पीडाग्रस्त लोक अमावास्येच्या वाऱ्या करून व्याधीमुक्त होतात अशी प्रचिती अनेकांना झाली आहे. सिताराममहाराजांच्या पश्र्चात त्यांचे शिष्य द्वारकापुत्र तथा गो. बा.कुलकर्णी हे मठाची देखरेख करतात. हाजागृत मठ आहे.
40) श्रीस्वामी मठ, मैंदरगी ः ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर (अक्कलकोटपासून तीन मैलांवर)
अक्कलकोटच्या तुरुंगावर देखरेख करणारा जमादार मुसलमान याच्या हातून फरारी झालेला कैदी स्वामी कृपेने सापडल्यानंतर त्याने नोकरी सोडून उर्वरित आयुष्य श्रींच्या सेवेत घालविले. त्यांनीश्रींनी दिलेल्या पादुकांची मठात स्थापना केली. पुढेते परमार्थातील अधिकारी पुरुष झाले. एकाब्राह्मणाकडे त्यांनी मठाची व्यवस्था दिली.
41) श्रीस्वामी मठ, केज ः ता. केज, जिल्हा बीड
मोगलाई प्रांतात जोगाई आंब्यानजीक केज गावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले उत्पन्न श्रींचे कृपेने परत मिळाल्यानंतर तसेच घराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर ते अक्कलकोटला गेले. श्रींपुढेदहा हजार रुपये ठेवल्यानंतर श्री हसले व म्हणाले, "आम्हांस रुपये नको! जा नीघ घरी! घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव." पुढे देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर उकिरड्यावर पादुका मठ स्थापन केल्या. आजहीत्यांच्या वंशजांमार्फत मठाची सेवा अखंडित चालू आहे.
42) श्रीस्वामी मठ, मूर्तिजापूर ः जिल्हा अकोला
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे नारायणराव जमादार यांच्या घरी गजांत लक्ष्मी असून पुत्रसंतान नव्हते. श्रींचेपरम शिष्य बाळप्पा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना पुत्रसंतती झाली. पुढेत्यांचे चिरंजीव विठ्ठलपंत हेसुद्धा श्रींचे निस्सीम भक्त झाले. त्यांनीश्रींच्या स्वप्नदृष्टांतातील आदेशाप्रमाणे मूर्तिजापूर नगरपालिका हद्दीत गोवधहत्या बंदी कायदा पास केला. त्यांनीलोककल्याणाची बरीच कामे केली व मूर्तिजापूरला बाळप्पांनी दिलेल्या पादुकांची स्थापना केली. यामठाची व्यवस्था त्यांचे वंशज श्रीकृष्णकुमार पाहात असून श्रींचे अनेक उत्सव येथे संपन्न होतात.
43) श्रीस्वामी मठ, उमरेड ः नागपूर
नारायणराव बानेरकर यांना श्रींचे थोर शिष्य बाळप्पा यांनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांनी श्रींच्या पादुकांची स्थापना करून हा मठ बांधला.
44) श्रीस्वामी मठ, बडोदे, श्रीदत्तमंदिर ः स्वामी विवेकानंद मार्ग, गेंडी गेट रोड, बडोदे-390001
नगर जिल्ह्यातील वांबोरी गावचे वामनरावजी वैद्य यांना श्रींनी म्हटले, "आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील.' श्रींच्या या निस्सीम भक्ताने अद्वैतानंद हे नाम धारण करून "श्रीगुरुलीलामृत' हावेदतुल्य श्रीगुरुचरित्ररसाखा शक्तिशाली 55 अध्यायांचाग्रंथ लिहिला. आजहा ग्रंथ बहुतांशी स्वामी भक्तांच्या पठणात, पारायणातअसून अनेक भाविकांना त्याची प्रचिती आलेली आहे. त्यांनीबडोद्याला बांधलेल्या मठात श्रींच्या चरणस्पर्श पादुका व अभिमंत्रित दत्तमूर्ति आहे. वरीलगुरुलीलामृत ग्रंथाची हस्तलिखित प्रत या मठात असून आज परमपूज्य भास्कर शंकर पट्टणकर त्या मठाची व्यवस्था, पूजा-अर्चा करीत असतात.
45) श्रीस्वामी मठ, बडोदे (गुरुसेवा ट्रस्ट, बडोदे) ः
भोर येथील मोरेश्र्वर बाळकृष्ण होनप हे श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूर व शिनोरचे श्रीमत् सच्चिदानंदस्वामींचे अनुग्रहित शिष्य. त्याहोनप यांनी श्रीब्रह्मचारी स्वामी ऊर्फ मांगळेस्वामी हे नाव धारण करून लोककल्याणाचे कार्य केले व बडोदे येथे मठस्थापना केली.
46) श्रीस्वामी मठ, बडोदे (तारकेश्र्वर मठ) ः
बडोद्याचे श्रीमंत खंडेराव गायकवाड यांच्या पत्नी निस्सीम स्वामीभक्त जमनाबाई हिने आपली कन्या ताराराजे हिच्या नावे शिवालय बांधले. त्यातप्रवेशद्वाराजवळ श्रींच्या संगमरवरी मूर्ती आहेत.
47) श्रीस्वामी मठ, चांदोद (गंगनाथ आश्रम, चांदोद) ः जिल्हा बडोदा
रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857 च्यास्वातंत्र्य युद्धात भाग घेऊन ते भूमिगत झाले. तेश्रींच्या सान्निध्यात बरीच वर्षे होते. पुढे"ब्रह्मानंद' नावधारण करून व्याधीग्रस्तांसाठी शुश्रूषा केंद्र चालवून त्यांनी श्रींच्या तसबिरीची स्थापना त्या आश्रमात केली. आजतेथे त्या आश्रमाची सेवा त्यांचे भक्त पाहतात.
48) श्रीस्वामी मठ, सिनोर
तळेगाव हिवरेचे शंकर गोविंद कान्हेरे यांना श्रींनी उपदेश केला. "माता नास्ति, पिता नास्ति, नास्ति बंधू सहोदरः। अर्थं नास्ति, गृहं नास्ति, तस्यात जागृहि जागृहि।।" श्रींच्या आदेशानुसार त्यांनी तीन नर्मदा प्रदक्षिणा करून सच्चिदानंद हे नाम धारण करून मठ स्थापना केली.
49) श्रीस्वामी मठ, गुर्लहोसूर ः कर्नाटक राज्य
मुरगोडचे रामू ऊर्फ कैवल्याश्रम स्वामी ऊर्फ बोटे स्वामी यांना श्रींनी म्हटले, "पाणी फार खोल आहे. भिऊनकोस, मी तुझ्याबरोबर आहे. कारणलाख लाख ब्राह्मण भोजन!' हीअमृतवाणी खरी ठरून त्यांनी शिव चिदंबरेश्र्वराची 20 वर्षेसेवा केली.
याशिवाय येवले देवलग्राम, केज,विजापूर, ठाणे,वसई, देहू, चर्चन,सावईवेरे (गोवा),फलटण आणि विलेपार्ले येथेही श्रींचे जागृत मठ आहेत.
श्रींनी अक्कलकोटला असताना अनेकांची व्याधी नष्ट करून त्यांना पादुकांची पूजा अर्चा करण्यास सांगितले होते, पणत्यांचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्या अज्ञात मठांची माहिती मिळणे आज अशक्य झाले आहे. अक्कलकोटलाएक समंधी उपद्रवाचा ब्राह्मण व त्याची पत्नी उभयता आले होते. श्रींनीत्यांचा समंध घालविल्यानंतर पत्नीने श्रींना म्हटले, "माझ्या जन्माचे संकट निवारण केले. याअनाथ अबलेवर आपले महान उपकार झाले' असे म्हणून "महाराज, आता आम्ही काय करावे?' असेबाईने विचारताच श्रींनी आपले जोडे तिच्या अंगावर टाकले. तेतिने घेऊन प्रसाद शिरसामान्य करून ती आपल्या घरी गेली. त्याजोड्याचे तिने पूजन करून आपले उर्वरित आयुष्य घालविले. परंतुत्या पादुकांबद्दल ठावठिकाणा माहीत नाही.
श्रीस्वामी महाराजांकडे कुष्ठरोगाने पछाडलेला शूद्र दरवर्षी आपल्या कुटुंबासह दर्शनास येत असे. एकवेळ तो दर्शनास गेला असताना श्री म्हणाले, "तुझ्या परसात नूतन औदुंबराचा वृक्ष उगवला आहे. तेथे पादुका स्थापन कर." शूद्र घरी गेल्यावर पाहतो तो खरेच औदुंबराचे रोपटे उगवले आहे. मगश्रींच्या कृपेने त्याला द्रव्य मिळाले. त्यानेपादुका स्थापन करून मंदिर बांधले व तेथे तो सेवा करीत राहिला. परंतुतो मठ कोठे स्थापन केला आहे, याचाउल्लेख मिळत नाही.
अक्कलकोटास जोशी यांच्या घराच्या उत्तरेस एक पडीक जागा होती. त्याजागेत एक औदुंबराचे झाड असून नजीकच एक आड होता. याझाडाखाली श्रींची स्वारी कधी कधी येऊन बसत असे. एकेदिवशी गोपाळभट भिडे, मिरजकरसेवेकरी यांच्या मनात आले की औदुंबराखाली पादुका स्थापन करून मठ बांधावा पण "मनातील गोष्ट सिद्धीस जाणार कशी? आपणदरिद्री पडलो.' असा मनात विचार येत आहे तोच अंतर्ज्ञानी महाराज म्हणाले, "हवेली बांधून पादुकांची स्थापना कर.' तोम्हणाला, "पैसे कोठून आणू?' महाराजम्हणाले, "अल्लख कर म्हणजे पाहिजे तितके पैसे' गुरुआज्ञाप्रमाण मानून गोपाळभट धाराशिव वगैरे गावातून फिरून चार-पाचशे रुपये घेऊन आले.
गोपाळभटांनी अक्कलकोटासही वर्गणी जमा करून अजमासे हजार रुपये जमवून पंचांमार्फत देवालय बांधले. पादुकांचीपूजा-अर्चा शास्त्र विधिपूर्वक झाली. पूजा-अर्चेच्या प्रारंभी खुद्द श्रींची स्वारी येऊन "श्रीमत् महागणाधिपतयेनमः निर्विघ्न मस्तु' असेस्वतः म्हणून अर्चेस आरंभ करविला. मठातपादुकांची व श्रीविष्णू पंचायतनाची स्थापना केली. विनायकवासुदेव हे श्रींचे भक्त असून, अक्कलकोटासवारंवार येत. त्यांच्यामनात प्रेरणा होऊन त्यांनी आठ हजार रुपयांचा सभामंडप बांधला. भटजींनाकाळजी